You are currently viewing सामंत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजूंना धनादेशचे वाटप…

सामंत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजूंना धनादेशचे वाटप…

सावंतवाडी /-

मुंबई येथील सामंत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येथील डॉ. परूळेकर नर्सिंग होम येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्ण तसेच निराधार महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.यामध्ये राधाबाई राऊळ (कवठणी), विजयश्री निवेलकर (सावंतवाडी), कविता जाधव (असनिये), यशोदा जाधव (आरोंदा), रश्मी पेडणेकर (पेडणे, गोवा) अशा पाच लाभार्थी गरजू महिलांना विजय देसाई, अमोल टेंबकर या पत्रकारांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी या सर्व भगिनींना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थित मंडळींचे आभार मानले.

अभिप्राय द्या..