You are currently viewing इलेक्ट्रॉनिक मिडीया मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने माणगाव येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक मिडीया मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने माणगाव येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

कुडाळ /-

इलेक्ट्रॉनिक मिडीया मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज माणगाव येथील पत्रकार कक्षात पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबा खवणेकर आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष कृष्णा सावंत व माणगाव दूरक्षेत्राचे पोलिस अजय फोंडेकर यांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी स्वागत प्रास्ताविक मराठी पत्रकार संघ कुडाळ तालुका सचिव मिलिंद धुर यांनी केले.जेष्ठ पत्रकार भरत केसरकर व समिर म्हाडेश्वर यांनी पत्रकार दिनाविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष समिल जळवी,संदिप चव्हाण,अल्लाउदिन खुल्ली, मिनानाथ वारंग,माणगाव ग्रामपंचायत कर्मचारी बाबू कदम आदी पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेवटी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कुडाळ उपाध्यक्ष आनंद कांडरकर यांनी आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा