You are currently viewing अतिशय दुःखद घटना कुडाळ नगरपंचायत वार्ड क्रमांक १६ चे भाजपा अधिकृत उमेदवार<br>सुधीर चव्हाण यांचे हृदय विकाराने निधन.

अतिशय दुःखद घटना कुडाळ नगरपंचायत वार्ड क्रमांक १६ चे भाजपा अधिकृत उमेदवार
सुधीर चव्हाण यांचे हृदय विकाराने निधन.

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. गुरूवारी रात्री १२.३० वाजता ही घटना घडली आहे. सुधीर चव्हाण हे भाजपच्या तिकिटावर कुडाळ नगरपंचायत ची प्रभाग १६ मधून निवडून लढवत होते. गुरूवारी रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळ मधील भाजपच्या कार्यालयात आले. यानंतर ते एका ठिकाणी जायला गेले. तेथे पोहचल्यावर लगेजच त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र धक्का आला आणी ते खाली कोसळले. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. पण डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, छोटा मुलगा, आई असा मोठा परिवार आहे. ते कुडाळमधील डॉक्टर बाणवलीकर यांच्या यांना कृत्रिम दात पुरवठा करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. सुधीर हे मुळचे मालवणचे होते. पण गेली कित्येक वर्षं ते कुडाळात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते. ते क्रिकेट अप्रतिम खेळायचे. त्यामुळे कुडाळात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. कुडाळातील लोकांशी आणी मित्र परिवारांशी त्यांची नाळ जुळलेली होती. त्यांचा मृतदेह कुडाळातील रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. सकाळीच शवविच्छेदन करून नंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुधीर चव्हाण यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील लोकांवर मोठ संकट उभ राहिल आहे. तर त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा