कणकवली /-

5 वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी आम्हाला सहकार शिकवू नये. जिल्हा बँकेतील सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा राजन तेलींचा पराभव केला. जिल्हा बँकेतील माझा विजय हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यानी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. आपल्या झालेल्या पराभवानंतर भाजपातील गद्दारांची गय करणार नाही म्हणणाऱ्या राजन तेली यांनी आधी भाजपातील गद्दारांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान नूतन जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी दिले.

वैभव नाईक हे जनतेतून 2 वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले आमदार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत आमदारकी मिळालेल्या तेली यांनी वैभव नाईकांवर टीका करू नये. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, व्हिक्टर डांटस, विद्याप्रसाद बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत चांगले काम करणार आहोत. महाविकास आघाडीचे 8 संचालक आहेत. जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावर वचक ठेवणार आहोत, असेही नूतन जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले. कणकवली विधानसभा मतदारसंघ युवा सेना जिल्हाप्रमुख पदी निवड केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांचे आभार मानतो. आगामी काळात कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यात युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना बळकट करणार आहोत, असेही नाईक म्हणाले. यावेळी राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, गीतेश कडू, ललित घाडीगावकर, तेजस राणे, रोहित राणे, किरण वर्दम, प्रतीक रासम, रिमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page