You are currently viewing बांदा येथे उभ्या कारच्या काचा फोडल्या कारचे मोठे नुकसान अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल..

बांदा येथे उभ्या कारच्या काचा फोडल्या कारचे मोठे नुकसान अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल..

बांदा /-

बांदा निमजगा जिल्हा परिषद शाळेजवळ भरवस्तीत राजेश माने यांनी आपल्या मालकिची (एम.एच.१२ एफ. के. ८२७४) फोर्ड फिपेस्टा ही आलीशान कार उभी करुन ठेवली होती. अज्ञाताने कारच्या दर्शनी व मागील भागाची काच फोडुन मोठे नुकसान केले आहे. माने सकाळी गाडी काढण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी अज्ञाता विरोधात बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आठ दिवसांपूर्वी बांदा येथे अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत दुकानगाळ्याचे कुलुप तोडुन चोरी केल्याची घटना ताजी असतानाच बांदा निमजगा येथे भरवस्तीत उभी केलेल्या गाडीच्या काचा अज्ञातानी फोडल्या. श्री. माने सकाळी गाडी काढण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. फोर्ड फियेस्टा या आलीशान कारचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री. माने यांनी सांगितले. तसेच नुकसान करण्याच्या हेतूनेच काचा तोडल्या असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञाता विरोधात बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने पोलीसांना अज्ञाताच्या मुसक्या आवळण्यात लवकरच यश येणार आहे. दरम्यान, दोन दिवसात अज्ञाताच्या मुसक्या न आवळल्यास माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना संलग्न आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना बांदा पोलीसांची भेट घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..