You are currently viewing कुडाळ ज्यू. कॉलेज येथे वैभवी पेडणेकर हिचा सत्कार.

कुडाळ ज्यू. कॉलेज येथे वैभवी पेडणेकर हिचा सत्कार.

कुडाळ /-

कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळच्या १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मसुरे गावची कन्या आणि कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज बारावी सायन्स ए डिव्हिजनची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हीचा विशेष सत्कार करण्यात आला. मागील दोन वर्षामध्ये विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून वैभवी हिने कुडाळ जुनियर कॉलेजचे नाव राज्यामध्ये नावारूपास आणले. वैभवीच्या या कामगिरीबद्दल तिचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते कुडाळ जुनियर कॉलेज येथे करण्यात आला.

यावेळी कॉलेजच्या वतीने वैभवी पेडणेकरचे विशेष कौतुक करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहूणे सी. ए. सागर तेली,अध्यक्ष अरविंद शिरसाट, सामंत सर, गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डी. जे. शिरहट्टी, वैंगुर्लेकर मॕडम, उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, संस्था पदाधिकारी सुरेश चव्हाण, अनंत वैद्य, प्राचार्य शेवळे मॅडम, डाॕ. रविंद्र जोशी, निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. शिरसाट व बी. जी. सामंत, श्री. हावळ, निवृत्त मुख्याध्यापक मनोहर गुरबे उपस्थित होते. सुत्रसंचालन वेलणकर सर यांनी केले तर आभार आजगावकर सर यांनी मानले.

अभिप्राय द्या..