You are currently viewing जिल्हाभंडारी महासंघाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2022 ला होणार भंडारी वधु-वर मेळावा.;महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय.

जिल्हाभंडारी महासंघाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2022 ला होणार भंडारी वधु-वर मेळावा.;महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय.

वेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग ची मासिक सभा आज रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला जिल्ह्यातील भंडारी महासंघाचे सर्व तालुक्यातील सभासद उपस्थित होते.यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री.रमण वायंगणकर ,सेक्रेटरी विकास वैद्य ,मोहन गवंडे ,विलास आसोलकर ,सीताराम खडपकर ,उल्हास हळदणकर ,समील जळवी ,राजू गवंडे , श्रीकांत वेंगुर्लेकर ,दिलिप पेडणेकर ,सुनील नाईक ,अनंत कांबळी ,मनोहर पालयेकर ,निलेश गोवेकर ,तुकाराम करंगुटकर ,लक्ष्मीकांत मुंडीये उपस्थित होते.

जिल्हा महासंघाची सभा कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आली.तसेच कणकवली येथील रहिवासी श्री.निलेश गोवेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्य पदी निवड करण्यात आली.महासंघाच्या बैठककित सर्वांच्या एकमताने निलेश गोवेकर यांची जिल्हाभंडारी स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.त्यानंतर अध्यक्ष यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर मागील झालेल्या सभेचे ईतिवृत्त सभेत वाचन करण्यात आले.त्यानंतर महासंघाच्या अजेंड्यावर असलेल्या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर आणि सर्व सभासद यांच्या चर्चेतून जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने फेब्रुवारी 2022 ला जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने वधुवर सुचक मेळावा घेण्याच ठरविण्यात आले आहे.हा मेळावा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.अजून तारिक फायनल झाली नसून वधु-वर यांनी आपली नावे या 96237 27920 नंबर वर नोंदवावीत असे महासंघाच्या सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..