You are currently viewing कोण ? अजित पवार हे राणेंना उद्या समजेल.;अनंत पिळणकर.

कोण ? अजित पवार हे राणेंना उद्या समजेल.;अनंत पिळणकर.

कणकवली /-


अजित पवार कोण ? हे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना 31 डिसेंबर रोजी लागणाऱ्या जिल्हा बँक निवडणूक निकालातून दिसून येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला विजयी करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. सिंधुदुर्गात 26 डिसेंबर रोजी आलेल्या अजित पवार यांनी सहकारात राजकारण नको, असे म्हणत सहकारी बँक चालवण्यासाठी अक्कल लागते, असा टोलाही विरोधकांना लगावला होता. याबाबत केंद्रीय उद्योगमंत्री राणे यांना मीडियाने प्रतिक्रिया विचारली असता केंद्रीयमंत्री राणे यांनी कोण अजित पवार ? असा सवाल केला होता. राणे यांच्या या सवालाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी उद्या 31 डिसेंबरला लागणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनेलला एकहाती विजय मिळेल आणि राणेंना अजित पवार कोण हे समजेल, अशा शब्दांत उत्तर दिले.

अभिप्राय द्या..