You are currently viewing मनीष दळवींचा अटकपूर्व जामीन फेटाळला भाजपाला जिल्हा न्यायालयाचा दणका.

मनीष दळवींचा अटकपूर्व जामीन फेटाळला भाजपाला जिल्हा न्यायालयाचा दणका.

ओरोस/-

संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर असलेल्या असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी नाकारला आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत मनीष दळवी यांना यांचे नाव पुढे आले होते. मनीष दळवी हे आज निवडणूक होत असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत वेंगुर्ला तालुका मतदार संघातून उभे आहेत. त्यामुळे आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्या करिता अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी काल जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो असे सांगत न्यायाधीश हांडे यांनी मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन भेटायला आहे. मात्र त्यांच्या अटकपूर्व जामीनावर दुपारी सुनावणी होणार आहे.

अभिप्राय द्या..