You are currently viewing जिल्हा परिषद अध्यक्षांना राहिले नाही भान जिल्हाबँक मतदानादरम्यान,जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना केली शिवीगाळ..

जिल्हा परिषद अध्यक्षांना राहिले नाही भान जिल्हाबँक मतदानादरम्यान,जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना केली शिवीगाळ..

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्ह्यात सगळीकडे शांततेत मतदान सुरू असताना कणकवली मतदान केंद्रावर मात्र बाचाबाची झाली. संतोष परब हल्ल्या प्रकरणात ज्यांचे नाव समोर येऊन जे नीतेश राणेंसोबत गायब आहेत त्या संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांना पराभव डोळ्यासमोर दिसताच त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे समोर दिसतात आपल्या पदाचा विचार न करता त्यांना शिवीगाळ करत आपल्या असभ्य संस्कृतीच दर्शन पुन्हा एकदा जनतेसमोर घडवून आणलय. ”जसा राजा तशीच इथली प्रजा” या उक्तीला साजेस वर्तन आज कणकवली मतदान केंद्रात घडलय. परंतु ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांचे हे असभ्य वर्तन कितपत योग्य आहे आणि असे अशोभनीय कृत्य करणे हीच भाजपची संस्कृती आहे का..? याचा सारासार विचार जनता नक्कीच करेल.

अभिप्राय द्या..