You are currently viewing बेपत्ता खलशाचा मृतदेह देवबाग समुद्रात सापडला…

बेपत्ता खलशाचा मृतदेह देवबाग समुद्रात सापडला…

मालवण /-

समुद्रात ट्रॉलर वरून पडून बेपत्ता झालेला खलाशी महेंद्र दामोदर पालेकर (वय ३१, रा. विरार, मुंबई) याचा मृतदेह आज देवबाग जुवा येथील समुद्रात मच्छीमारांना आढळून आला. हा मृतदेह महेंद्र पालेकर याचाच असल्याची स्पष्टोक्ती सहकारी खलाशी रामू रामप्रसाद प्रजापती (रा. उत्तरप्रदेश) याने देत याबाबत मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.

अभिप्राय द्या..