You are currently viewing संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्यातील आरोपींची नावे जाहीर.;आतापर्यंत ६ संशयित आरोपी अटकेत,विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची माहिती..

संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्यातील आरोपींची नावे जाहीर.;आतापर्यंत ६ संशयित आरोपी अटकेत,विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची माहिती..

सिंधुदुर्ग /-

कणकवली तालुक्यात सतीश सावंत यांचे खंदे समर्थक,बँक निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला १८ डिसेंबरला झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत ६ आरोपींना अटक केली तरी नावे जाहीर केली नव्हती. तब्बल ११ दिवसांनी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी १० आरोपी या गुन्ह्यात असल्याचे सांगत नावे जाहीर केली आहेत.

त्या संशयित आरोपीमध्ये चेतन यशवंत पवार,( वय 22 शिला साळवे मार्केट चित्रा चोक पुणे येरवडा पुणे शहर), करणं बाळासाहेब कांबळे (वय 24 खराडी थिटेनगर ता. हवेली पुणे) अनिल शंकर नक्का( वय 25 बी डी कामगार वसाहत गणेश नगर येरवडा पुणे), करण दत्तू कांबळे( वय 22 आदर्श इंदिरा नगर येरवडा पुणे आरटीओ ऑफिस समोर पुणे), दीपक नामदेव वाघोदे,( वय 36 बिश्नोई मंदिर जवळ थिटे नगर खराडी पुणे), सचिन ज्ञानदेव सातपुते,( वय 41 पुणे चंदन नगर खराडी पुणे), ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणूरे, (रा खराडी हवेली पुणे), धीरज जाधव( रा. साईनाथ नगर खराडी पुणे). तर आ. नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, राकेश परब आणि मनीष दळवी यांचीही नावे या गुन्ह्यात संशयित म्हणून घेण्यात आली आहेत.दरम्यान आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालयात गुरुवारी निर्णय होणार आहे. तर मनीष दळवी हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार असून त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बुधवारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावरही गुरुवारी निर्णय होणार आहे.

अभिप्राय द्या..