कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी २८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण तर ओरोसमध्ये ११ रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ६९९ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवार २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कुडाळ ५, वर्दे २, ओरोस ११, गुढीपूर १, कसाल १, माणगाव १, झाराप १, पणदूर १, वेताळ बांबर्डे १, घोडगे १, वालावल १, रानबांबुळी १, तळेगाव १ असे रुग्ण आढळून आले आहेत.तसेच तालुक्यात २४७ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १८१ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ६६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.