नवी दिल्ली /-

देशातील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललं आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराबरोबरच इतर व्हेरिंएंटची लागण झालेले रुग्णही वाढू लागले आहेत.दिल्लीमध्ये हा वेग अधिक असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्ली सरकारने कठोर नियम करण्यास सुरूवात केली आहे. सरकारकडून मंगळवारी ‘यलो अलर्ट’ जारी करत अनेक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे दिल्लीत आता अंशत: लॉकडाऊन असणार आहे.*

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेत दिल्लीतील कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.5 टक्क्यांच्या वर गेले आहेत. त्यामुळे यलो अलर्ट अंतर्गत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत किंवा व्हेंटिलेटिरच्या वापरात वाढ झालेली नाही, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्लीमध्ये सोमवारी 331 रुग्ण आढळून आले आहेत. नऊ जूननंतर पहिल्यांदाच एवढे रुग्ण आढळून आले आहेत. यादिवशी पॉझिटिव्हिटी रेट 0.68 टक्के होता, तर आदल्यादिवशी हा दर 0.55 टक्के एवढा होता. दरम्यान, यलो अलर्ट अंतर्गत दिल्लीमध्ये अनेक निर्बंध तातडीने लागू करण्यात आले आहेत. शहरात आधीच रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्या आली आहे. आता हे निर्बंध आणखी वाढवण्यात आले आहेत.

असे आहेत दिल्लीतील निर्बंध…

– रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी

– सम-विषम नियमानुसार दुकाने, मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत खुली राहतील.

– उद्योगधंदे सुरू राहणार

– बांधकाम क्षेत्राला दिलासा, कामे सुरू ठेवण्यास परवानगी

– उपाहरगृहे सकाळी 8 ते रात्री 10 यावेळेत तर बार हे दुपारी 12 ते रात्री 10 यावेळेत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

– चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, सभागृह अनिश्चित काळासाठी बंद राहणार

– हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी, पण कार्यक्रमाचे हॉल बंद राहणार

– स्पा, जिम, सलून, ब्युटी पार्लर, योगा इन्स्टिट्यूट, मनोरंजन पार्क बंद राहणार

– दिल्ली मेर्टो 50 टक्के क्षमतेने धावणार

– आंतरराज्य बस 50 टक्के क्षमतेने धावणार

– रिक्षा, ई-रिक्षा, टॅक्सी, सायकल रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना परवानगी

– स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम, जलतरण तलाव बंद राहणार

– सार्वजनिक उद्याने सुरू राहणार

– विवाह समारंभांना केवळ 20 लोकांना उपस्थितीची परवानगी

– सामाजिक, राजकीय, धार्मिक, उत्सव आणि इतर मनोरंजनात्मक उपक्रमांवर बंदी

– धार्मिक ठिकाणे खुली राहणार पण भक्तांना प्रवेशासाठी बंधने

– शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार

– खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page