मुंबई /-
राज्यात कोरोनाचा नवी व्हेरिएंट ओमायक्रॉनचे एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे.पण, ‘तिसरी लाट म्हणून सरकार याकडे पाहत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. हिवाळी अधिवेशनाचे सूप मंगळवारी वाजले.
त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढत आहे. यावर आरोग्य यंत्रणा नजर ठेवून आहे.’तिसरी लाट म्हणून सरकार याकडे पाहत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
बहुमताच्या जोरावर कोणत्याही बाबी आम्हाला करता येत होतं, pqn घटनेची पायमल्ली होईल असं आम्ही वागलो नाही. पुनः एकदा राज्यपालांना भेटणार आहोत, कारण पुढच्या अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक घ्यायची आहे, अशी माहितीही अजितदादांनी दिली. ‘शेवटचं बिल आणल्यांनातर फडणवीस आणि मुनगंटीवार बोलले. कुठेही राज्यपालांचं अनादर करणे असं कुठेच होऊ दिलं नाही.हे बिल अजिबात होता कामा नये किंवा फेब्रुवारीमध्ये पुनः एकदा ते चर्चेला आणा असं म्हणाले होते. पण, त्याचे नेते वाटेल ती विधानं करतात. मला राज्य विकायचे असते तर 2 वर्षे कशाला वाट बघितली असती. राज्य विकायला निघालो असं कुणी म्हणालं तर तसं होत नाही, असं म्हणत अजितदादांनी पडळकरांना टोला लगावला.
तसेच ‘आमच्याकडून काही चुकूलं असेल तर नक्की बोला. आरोप करा ना पण पटतील असं करा. 100 टक्के मतांनी सगळे कायदे पारित होतात असं नाही, असं म्हणत अजितदादांनी फडणवीस यांना टोला लगावला.
‘शक्ती विधेयक हा ऐतिहासिक विधेयक मंजूर केला आहे. नारी शक्तीला आणखी ताकत मिळणार आहे. तसंच कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घटनेवर सरकारची भूमिका मांडली. ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक घेऊ नये यासाठी विधयेक मंजूर केला आहे.
विदर्भामध्ये जास्त निधी खर्च केले आहे. मराठवाडा मध्ये उपलब्ध निधी खर्च केला आहे. उर्वरित महाराष्ट्र मध्ये 55 टक्के निधी खर्च केला आहे. भीमा कोरोगाव विकसित करण्याचा निर्णय झाला, अशी माहितीही अजितदादांनी दिली.