You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून नोटीस..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून नोटीस..

सिंधुदुर्ग /-

सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब हल्ल्यातील आरोपी असलेले आमदार नितेश राणे यांच्या शोधात पोलीस आहेत. एकीकडे नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे पोलीस नितेश राणेंच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहेत. त्यातच पत्रकारांनी नितेश राणे कुठे आहेत याबाबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता केंद्रीयमंत्री राणे यांनी नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे काय ? असा प्रतिसवाल पत्रकारांना केला होता.यावरून नितेश राणे कुठे आहेत हे केंद्रीयमंत्री राणेंना माहिती असण्याची शक्यता गृहीत धरून कणकवली पोलिसांकडून नारायण राणे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..