You are currently viewing विलास रेडकर यास व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

विलास रेडकर यास व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

सिंधुदुर्ग /-

रेडी हुडावाडी येथे रहाणारे श्री. विलास रेडकर व त्यांची पत्नी सौ. वैशाली यांना ऑलविन फर्नांडीस, फैलिक्स फर्नांडीस, सुधीर कोंडये, दिनेश माजगावकर यांनी मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून त्यांच्याविरुद्ध चेंगुर्ला पोलीसांनी भा. द. वि. कलम ३२४, ३२३, ५०६ सह ३४ व वाहन अपघात कायदा कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्याकामी सर्व आरोपींची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वेंगुर्ला श्रीम. के. के. पाटील यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. मिहिर भणगे, अॅड. तुषार भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल माळवणकर व अॅड. मधुरा सबनीस-पाडगावकर यांनी अॅड. एस. एन. उर्फ अजित भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहीले.

यातील हकीगत अशी की, रेडी हुडावाडी येथे रहाणारे व्यवसायाने इलेक्ट्रीशियन असलेले श्री. गिरीश विश्राम रेडकर यांनी दिनांक १९.०३.२०१८ रोजी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अशी फिर्याद दिली की. दिनांक १८.०३.२०१८ रोजी रात्रौ ते जेवणखाण करून घराच्या बाहेर थांवले होते. त्यावेळी त्यांचे वडील श्री. विलास हरी रेडकर, आई सौ. वैशाली विकास रेडकर व पुतण्या ओंकार हरीष रेडकर असे जेवणखाण करून घरासमोरून जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्याकडेने शतपावली करत होते. ते रस्त्याच्याकडेने शतपावली करत असताना एक सिल्चर ग्रे रंगाची चारचाकी गाडी सुसाट वेगाने व्यांच्याजवळून तारवाडीच्या रस्त्याने निघून गेली. व्या गाडीत ऑल्विन फर्नांडीस व त्याचे मित्र असे चार इसम होते. ते चार मिनीटांनी परत तारवाडीकडून तेरेखोलच्या दिशेने सुसाट वेगाने जात असता व्यांच्या वडीलांनी गाडीस हात दाखवून सांगितले की, हा रस्ता हायवे नाही. गाडी सावकाश चालवा. माझ्यासोबत माझा छोटा नातू असून त्याला तुमच्या गाडीची ठोकर लागली असती. तेव्हा तु कोण सांगणारा, असे म्हणून वे इसम खाली उतरले. वे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी शिवीगाळ केली. वडीलांच्या हातात असलेली कुत्र्यांसाठी घेतलेली काठी हिसकावून घेतली व वडीलांना मारू लागले. तसेच आईच्या कानाखाली खेचली व तिला ढकलून देऊन गाडीत बसले. फिर्यादी हा त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत असता त्याला हूल देवून वे एमएच ०७-एजी ०९६५ या गाडीतून पळून गेले. त्यात दोन दारुचे बॉक्सही होते. गावातील लोक जमा झाले व त्यांनी वायरलेसवरून तक्रार दिली. त्याची दखल पोलीसांनी घेतली नाही म्हणून व रेडी पोलीस स्टेशनवर कुणीही उपस्थित नसल्यामुळे त्यांनी वेंगुळे पोलीस स्थानकात खबर दिली. तत्पूर्वी त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. याकामी सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात युक्तीवाद करताना अॅड. भणगे यांनी मे. न्यायाळ्याच्या असे निदर्शनास आणून दिले की, फिर्यादी पक्षाने आरोपींची गाडी अडवून त्यांना धमकी दिलेली होती. झालेले तोंडी पुरावे व वैद्यकीय प्रमाणपत्र याच्यात तफावत आढळून येते. फिर्यादीची आई व जमा झालेले लोक यांना तपासण्यात आले नाही. आरोपी हे मद्यधुंद स्थितीत होते व व्यांच्याकडे दोन दारुचे बॉक्स होते, हे ही फिर्यादी पक्ष सिध्द करू शकले नाहीत. विशेष म्हणजे दूर उभ्या असलेल्या फिर्यादीस गाडीतील दारुचे बॉक्स दिसले कसे, हे ही समजून येत नाही. फिर्यादीने आपल्या आई-वडीलांना मारहाण होत असताना बघ्याची भूमिका का घेतली? हेही समजून येत नाही. वरील सर्व गोष्टींचा विचार करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वेंगुर्ला श्रीम. के. के. पाटील यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. मिहिर भणगे, अॅड. तुषार भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर व अॅड. मधुरा सबनीस-पाडगावकर यांनी अॅड. एस. एन. उर्फ अजित भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले.

अभिप्राय द्या..