You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूक एक मतदार गायब झाल्याने खळबळ..

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूक एक मतदार गायब झाल्याने खळबळ..

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातील विकास सोसायटी मतदार संघातील मतदार असलेले प्रमोद महिपत वायंगणकर (वय-41, रा.तळेरे बाजार पेठ) यांचे 19 डिसेंबरला अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.त्यांचा 30 डिसेंबर पूर्वी तातडीने शोध लावावा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी बेपत्ता शिवसेना प्रमोद वायंगणकर यांचे भाऊ शरद वायगणकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,नगरसेवक कन्हैया पारकर,संदेश पटेल,वैभव कांबळे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या आधी खुनी हल्ल्याचा प्रकार घडलेला होता. त्यात आमदार नितेश राणे यांची चौकशी पोलिसांनी केली. आता आणखी एक गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण घडल्याची तक्रार करण्यात आली आहे.दरम्‍यान संदेश पारकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने आज पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रमोद महिपत वायंगणकर यांचा तपास एका दिवसात लावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्‍ही दिला आहे. वायंगणकर यांनी जिल्हा बँक निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्याच्या मोबाईल वर कॉल आले आहेत. त्‍यांचा पोलिसांनी शोध घेतला तर या सगळ्या घटनेमध्ये कोण आहे? आणि कशा कशा पद्धतीने त्यांना पळवून नेण्यात आले आहे. याचा शोध लागू शकतो. त्‍यामुळे या प्रकरणाचा तातडीने तपास करावा अशी मागणी आम्‍ही पोलिसांकडे केली आहे.

दरम्‍यान कणकवलीत तालुक्यामध्ये दोन दहशतवादी घटना घडलेल्या आहेत. जिल्हा बँकेचे सर्वेसर्वा सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा बँकेची निवडणूक लढवत आहोत. सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर दिवसाढवळ्या हल्ला केला. तर दुसऱ्या घटनेत जिल्‍हा बँकेच्या मतदाराला पळविण्याचा प्रकार झाला आहे. त्यांना मतदानापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न हा या सगळा प्रयत्न आहे. या बँकेच्या मतदारांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे असेही श्री.पारकर म्‍हणाले.

अभिप्राय द्या..