You are currently viewing रेल्वे स्थानकासमोर विकत होते गांजा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

रेल्वे स्थानकासमोर विकत होते गांजा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

रत्नागिरी /-
रत्नागिरी पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकाजवळ या गांजाची विक्री होत असताना पोलिसांनी ही कारवाई केली.

२५ हजार ४२५ रुपये किंमतीचा एक किलो गांजाची विक्री होत होती. निरंकार राजेंद्र शिंदे ऊर्फ नदीम समीर जसनाईक आणि तौसिफ इक्बाल चौगुले या दोघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

खेड रेल्वे स्थानक परिसरात गांजा विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. निरंकार राजेंद्र शिंदे ऊर्फ नदीम समीर जसनाईक (२१) आणि तौसिफ इक्बाल चौगुले (२१) हे दुचाकीवरून खेड रेल्वे स्थानकात पोहचले.

अभिप्राय द्या..