You are currently viewing बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे बचत गट मेळावा संपन्न…

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे बचत गट मेळावा संपन्न…

रत्नागिरी /-

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने गोवा विभागामार्फत जिल्ह्यात सर्व शाखांमध्ये बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शाखांमधून बचत गट सदस्याना विविध योजनांची माहिती करून देण्यात आली.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधान मंत्री सुरक्षा योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या योजनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

रत्नागिरी शहर शाखेत याच कार्यक्रमात,प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजने अंतर्गत लाभार्थी कु तेजल अशोक बने यांना,बँक ऑफ महाराष्ट्र गोवा क्षेत्र प्रबंधक आनंद शंकर एजीएम यांच्या हस्ते ₹ 200000/- दावा मंजूर पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी शहर शाखा मुख्य प्रबंधक आनंद डिंगणकर,गोवा विभाग सीपीसी मुख्य प्रबंधक विक्रम गोंधळी, अधिकारी मयूर दोशी उपस्थित होते.

या विमा योजनांचे सभासदत्व स्वीकारून आपले जीवन सुरक्षित करावे असे आवाहन गोवा क्षेत्रीय प्रबंधक आनंद शंकर यांनी याप्रसंगी केले.

अभिप्राय द्या..