You are currently viewing कुडाळ बीडीओंची होणार सखोल चौकशी.;स्थायी समिती सभेत गंभीर दखल..

कुडाळ बीडीओंची होणार सखोल चौकशी.;स्थायी समिती सभेत गंभीर दखल..

ओरोस /-

कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर सभापती नूतन आईर यांनी केलेल्या गंभीर आरोपाची दखल आज झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत घेण्यात आली. सभापती सौ आईर यांनी गटविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी कागदोपत्री योजना आणि उपक्रम राबविले असल्याचा आरोप असल्याने त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या संजय पडते यांनी केली. त्याला सत्ताधारी गटनेते रणजित देसाई यांनीही अनुमोदन दिले. पुढील सभेत चौकशी अहवाल ठेवण्याचे आदेश सभाध्यक्षा संजना सावंत यांनी दिले.

जिल्हा परिषद स्थायी समिती सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विषय समिती सभापती महेंद्र चव्हाण, अनिशा दळवी, सदस्य रणजित देसाई, संजय पडते, अमरसेन सावंत, विष्णुदास कुबल, संतोष साटविकलर, रवींद्र जठार, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, अधिकारी आदी उपस्थित होते.

कुडाळ गटविकास अधिकारी यांनी सभापती या नात्याने आपल्याला,विश्वासात न घेता पंचायत समितीचा कारभार हाकला आहे. अनेक योजना केवळ कागदोपत्री राबविल्या. आर्थिक अनियमितता केली आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्याची लेखी मागणी सभापती सौ आईर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. यानंतर प्रसारमाध्यमातून याबाबत माहिती दिली होती. याचे पडसाद आज झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. सेनेच्या संजय पडते यांनी हा विषय काढत सभापती आपल्याच गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करतात. सभापती एकीकडे, सदस्य एकीकडे अशी स्थिती आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय व्हायला नको. चूक नसेलतर एका अधिकाऱ्याचे खच्चीकरण होऊ नये, असे सांगत याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. अध्यक्षा सौ सावंत यांनी मागणी मान्य करतानाच कोणाचेही खच्चीकरण होणार नसल्याचे सांगितले.

अभिप्राय द्या..