मुंबई /-
संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जबरदस्त खडाजंगी सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ही नोटीस, गेल्या निवडणुकांत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनाही आयकर विभाग नोटीस धाडण्याची शक्यता आहे.
पवार म्हणाले…
यासंदर्भात मंगळवारी शरद पवार यांना विचारले असता, ‘आपल्यावर प्रेम असल्याने आनंद आहे. पहिल्यांदाच मला नोटीस आली.सुप्रिया यांना येणार असल्याचे समजते. चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा आनंद आहे.
‘मला सोमवारी नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून ही नोटीस आली आहे.त्याचे उत्तर आपण लवकरच देऊ. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात ही नोटीस आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या भाजपा आणि राज्य सरकार यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशातच आयकर विभागाचे नोटीस प्रकरण समोर आले आहे.