You are currently viewing पिंगुळी येथील मृणाल सावंत हिचे कथक विशारद परीक्षेत प्रथम श्रेणी पटकावत मिळवीले नाविन्यपूर्ण यश.

पिंगुळी येथील मृणाल सावंत हिचे कथक विशारद परीक्षेत प्रथम श्रेणी पटकावत मिळवीले नाविन्यपूर्ण यश.

कुडाळ /-


कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील मृणाल अजय सावंत हिने कथक विशारद पूर्ण परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवीत यश संपादन केले
नृत्यांगना मृणाल सावंत ही सांस्कृतिक क्षेत्रात नृत्यकलेमध्ये सिंधुदुर्गसह महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यात नावलौकिक मिळवित जिल्ह्याची एक नामांकित नृत्यांगना म्हणून यशस्वी वाटचाल करीत आहे राज्य आंतरराज्य स्पर्धासह दूरदर्शन टीव्ही शोमध्ये ही आपल्या कलेची चमक दाखवीत नामवंत कलावंतानी तिचे भरभरून कौतुक केले पिंगुळीच्या या गुणी नृत्यांगनीने वयाच्या सहाव्या वर्षी कथक प्रशिक्षणाचे धडे देवगड येथील सौ अनुजा गांधी यांच्याकडे घेण्यास सुरुवात केली गेली बारा वर्षे ती कथक चे धडे घेत आहे सध्या कथक मध्ये ती प्रथम विशारद परीक्षा पास झाली होती आता विशारद पूर्ण परीक्षेत तिने प्रथम श्रेणी प्राप्त केली कोरोना महामारी संकटामुळे दोन वर्षे ही परीक्षा लांबणीवर गेली होती ऑक्टोबर 2021ला ही परीक्षा झाली त्याचा निकाल लागला आहे मृणालने वयाच्या दहाव्या वर्षी 21 फेब्रुवारी 2010 मध्ये तिने जिल्हा राज्य आंतरराज्य स्पर्धेला सुरुवात केली सिंधुदुर्गासह पुणे मुंबई सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी उस्मानाबाद जवळा सोलापूर सांगोला देवरुख रत्नागिरी आदी महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्ह्यासह गोवा कर्नाटक राज्यामध्ये तिने स्पर्धेत विजेते पद मिळवले आहे आतापर्यंत तिने सिंधुदुर्गासह महाराष्ट्र राज्य व गोवा या ठिकाणी शो नृत्य स्पर्धा आदी मिळून 7 डिसेंबर 2021 अखेर तिने 2652 कार्यक्रम केले राज्य शासनाच्या उपक्रमात सहभाग घेतला तिने विशारद पदवीचे धडे गुरू अनुजा गांधी यांच्याकडे घेतले आहेत विशारद परीक्षा पूर्ण साठी संगीतसाथ हार्मोनियम अमित उमळकर व तबला अतुल उमळकर यांची होती
सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी पाहता 21 फेब्रुवारी 2010 मध्ये स्पर्धेच्या माध्यमातून नृत्याचे पहिले पाऊल न्हावेली ता सावंतवाडी येथे पडले तिथे विजेती ठरली त्यानंतर तिने 2010मध्ये झी मराठी पाऊल पडते पुढे च्या अंतिम फेरीमध्ये कर्जत येथे प्रवेश मिळवला 2012 मध्ये त्यावेळी इ टीव्ही च्या मॅड म्हणजे अस्सल डान्सर मध्ये 2500 स्पर्धकातून निवड होऊन मेघा फायनल मध्ये गोरेगाव येथे आपली चमक दाखवली 2013 मध्ये सह्याद्री वाहिनी वरील दम दमा दम मध्ये उपविजेती ठरली बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत कथक मध्ये तिला गोल्ड मेडल प्राप्त झाले सह्याद्री वाहिनीच्या धीना धीन धा या कार्यक्रमात तिने सहभाग घेतला शासनाच्या विविध उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असतो नामवंत गायक विश्वजीत बोरवणकर मधुरा कुंभार उर्मिला धनगर चैतन्य कुलकर्णी याच्या गाण्यावर तिने लाईव्ह नृत्य शो केले सिंधुदुर्गासह कोल्हापूर रत्नागिरी मुंबई गोवा डिचोली याठिकाणी शो केले मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तिने सहभाग घेतला कै लक्ष्मीकांत बेर्डे याच्या स्मरणार्थ पुणे येथे झालेल्या नृत्य स्पर्धेत राज्यभरातील 1500 स्पर्धकातून अंतिम 10 मध्ये निवड झाली नृत्याचे धडे घेताना गेली दोन वर्षे तिने आदरणीय पंडित बिरजू महाराजांकडे नेहरू तारांगण वरळी येथे गुरू सौ गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कथक चे धडे घेतले जिल्ह्यातील विविध संस्था व समाजाने वेळोवेळी सत्कार केलेला आहे शासनाच्या सिंधू महोत्सव तसेच लायन्स फेस्टिवल रोटरी फेस्टिवल यामध्ये तिने निमंत्रित म्हणून नृत्यविष्कार केलेला आहे वयाच्या दहाव्या वर्षापासून ती स्वतःची नृत्यामधील गाण्यावर कोरिओग्राफी करते पंडित बिरजू महाराजांनी सुद्धा राज्यभरातून आलेल्या मुलांसमोर तिने सादर केलेल्या कथक नृत्या बाबत त्यांनी विशेष कौतुक केले त्यांनी केलेले कौतुक हे मृणालसाठी अविस्मरणीय क्षण असल्याचे ती सांगतेअलीकडेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या श्रावणमेळा कार्यक्रमात तिला मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते
फोटो
मृणाल सावंत

प्रतिक्रिया व्यक्त करा