सिंधुदुर्गनगरी /-

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट् शासनाने सुरु केलेल्या “ माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या महत्त्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात जोरदार सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात दिनांक 21 सप्टेंबर 2020 च्या प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत 26 हजार 527 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
“ माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकुण 569 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये एकुण 1 हजार 732 डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांकडे एकुण 389 पल्स ऑक्सिमीटर असून 437 थर्मल स्कॅनर गन आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकुण 22 हजार 329 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून तालुका निहाय सर्वेक्षण पूर्ण झालेल्या कुटुंबांची संख्या पुढील प्रमाणे वैभववाडी- 2 हजार 994, कणकवली- 6 हजार 787, देवगड- 1 हजार 775, मालवण- 1 हजार 939, कुडाळ-977, वेंगुर्ला- 5हजार 921, सावंतवाडी 1 हजार 676, दोडामार्ग-260
शहरी भागातील एकुण 4 हजार 198 कुटुंबांना भेटी देण्यात आल्या असून नगरपरिषद, नगरपंचायत निहाय संख्या पुढील प्रमाणे – सावंतवाडी-264, मालवण-491, वेंगुर्ला-380, कणकवली – 592, कुडाळ – 1 हजार 904, कसई-दोडामार्ग- 225, वाभवे-वैभववाडी -42, देवगड -जामसंडे- 340,
“ माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या मोहिमेंअंर्गत 569 आरोग्य तपासणी पथकांव्दारे जिल्ह्यातील 26 हजार 527 कुटुंबामधील 1 लाख 35 हजार 738 सदस्यांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेंअंतर्ग इतर रोग असणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page