सावंतवाडी /-

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत हॉटेल मँगो 2, मोती तलाव समोर, सावंतवाडी येथे “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी व खोखो खेळाची सद्यस्थिती” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सदरील चर्चासत्रात जिल्ह्यातील ज्येष्ठ मातब्बर राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू सहभागी होणार असून निवडक स्वयंसेवी संस्था तसेच विविध स्पर्धा आयोजित करणारी अधिकृत क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

गेली अनेक वर्ष या दोन्ही खेळात होत असलेली पिछेहाट याबाबत गंभीर चर्चा होणार असून पुन्हा एकदा दोन्ही देशी खेळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विशेष आराखड्याचे नियोजनसुद्धा करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू, पंच, प्रशिक्षक, हितचिंतक तसेच विरोधकांनी या उपक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन नंदन वेंगुर्लेकर, सचिव सिंधुदुर्ग जिल्हा खोखो असोसिएशन व प्रसाद अरविंदेकर, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page