You are currently viewing माजी आम. प्रमोद जठार यांची खासदार विनायक राऊत यांच्यावर<br>टीका.

माजी आम. प्रमोद जठार यांची खासदार विनायक राऊत यांच्यावर
टीका.

देवगड /-

खासदार विनायक राऊत यांना अर्थशास्त्र कशाशी खातात हेच माहीत नाही, हे तळकोकणवासीयांचे दुर्दैव आहे. खा. राऊत यांनी आपला इगो सोडावा. मुख्यमंत्री ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे. मात्र खा. विनायक राऊत स्वतःच्या इगो जपण्यासाठी ग्रीन रिफायनरी ला खो घालत आहेत. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या मच्छीमारी, आंबा, काजू पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा हमखास दीड लाख युवकांना शाश्वत रोजगार देणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला साथ द्यावी, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेत केले.

अभिप्राय द्या..