You are currently viewing देवगड महाविद्यालयातील एन.सी. सी.विभागातर्फे राबवण्यात आला स्वच्छता उपक्रम..

देवगड महाविद्यालयातील एन.सी. सी.विभागातर्फे राबवण्यात आला स्वच्छता उपक्रम..

देवगड /-

पुनीत सागर अभियानांतर्गत देवगड महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागातील विद्यार्थ्यांनी देवगड मिठमुंबरी परीसरातील सागर किनारी स्वच्छता मोहिम राबवली. या मोहिमेत कँडेटने जमा केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यात देवगड नगरपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. मोहिम सुरू करण्यापूर्वी एन.सी.सी.कँडेट्स यांनी सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली. सदर प्रसंगी प्रा. मालवणकर सर व एन. सी. सी चे ६० केडेट्स उपस्थित होते.

अभिप्राय द्या..