You are currently viewing सुरेश प्रभू यांच्या वतीने कणकवली तालुक्यातील १२० शिलाई मशीनचे कासार्डेत वितरण..

सुरेश प्रभू यांच्या वतीने कणकवली तालुक्यातील १२० शिलाई मशीनचे कासार्डेत वितरण..

नांदगाव /-

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व विमानप्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू शिवणकाम करणा-या महिलांसाठी शिलाई मशीन वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मध्यंतरी कोरोना पार्श्वभूमीवर एकत्र येणे शक्य नव्हते म्हणून त्या त्या परिवर्तन केंद्रामार्फत सदर शिलाई मशीन वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कणकवली तालुक्यातील निवडण्यात आलेल्या परिवर्तन केंद्र यांना कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयात शिलाई मशीन ताब्यात देण्यात आले आहेत. कणकवली तालुक्यात 12 परिवर्तन केंद्र असून 120 मशिन वितरण करण्यात आले आहेत. यात नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्टही सुरेश प्रभू यांच्या जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांच्या परिवर्तन केंद्रात समाविष्ट करण्यात आले आहे . शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 10 वा. नांदगाव येथील निवड झालेल्या महीलांना शिलाई मशीन वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

अभिप्राय द्या..