You are currently viewing कणकवली आगारातून पहिली बस सावंतवाडीसाठी रवांना..

कणकवली आगारातून पहिली बस सावंतवाडीसाठी रवांना..

कणकवली /-

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरण आंदोलनावर एसटी कर्मचारी ठाम असले तरी आज कणकवली आगारातुन दुपारी 2.15 वाजता कणकवली सावंतवाडी बस 4 प्रवाशांना घेऊन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू असून काही मोजकेच कर्मचारी कामावर आल्याने प्रशासन त्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एसटी सुरू करण्या संबंधात ठोस पावलं उचलत असल्याचे चित्र दिसत आहे.

आज दुपारी चोख पोलिस बंदोबस्त ठेवत कणकवली ते सावंतवाडी बस कणकवली आगारातून रवाना करण्यात आली आहे. यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ ,पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, विभागीय वाहतूक अधिकारी मोहन खराडे, कामगार अधिकारी गोसावी, सुरक्षारक्षक अधिकारी भानुदास मदने व चालक कासले उपस्थित होते.

अभिप्राय द्या..