You are currently viewing इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन व रोवर मशीन ने जमीन मोजणीचे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण..

इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन व रोवर मशीन ने जमीन मोजणीचे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण..

देवगड /-

सिंधुदुर्ग भूमी अभिलेख विभागचे कर्मचारी व अधिकारी जमीन मोजणीच्या आधुनिक तंत्रज्ञानात सक्षम करण्यासाठी कुडाळ भूमी अभिलेख कार्यालयात दिनांक 1 ते 4 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन व रोवर या मशीन द्वारे जमीन मोजणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना आपल्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वश्री सुनील परब, भालचंद्र सावंत, विनय शिर्के, हमीद शेख, प्रशांत ओमासे या माहितगार कर्मचाऱ्यांमार्फत प्रशिक्षण इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन चे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच रोवर मशीन वापराचे प्रशिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील माहितीगार कर्मचारी सर्वश्री अभिजित चव्हाण, अवधूत पाटील, महेश साळोखे यांनी प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रियदा साकोरे उप अधीक्षक भूमी अभिलेख, कुडाळ व नरसु रेडकर, मुख्यालय सहाय्यक आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी केले आहे. यामुळे लवकरच जिल्ह्यात नवीन इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन व रोवर या मशीन उपलब्ध होणार आहेत. तसेच जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना या मशीन च्या वापराचे सखोल ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे, ही बाब विचारात घेऊन एन. के. सुधांशु, जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य आणि मा. मिलिंद चव्हाण,उप संचालक भूमी अभिलेख, कोकण प्रदेश मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित केले असल्याचे डॉ. विजय वीर, जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख, सिंधुदुर्ग यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..