वेंगुर्ला /-

दिव्यांग बांधवांनी आपापसातील विश्वास, संवेदना जपाव्यात.अपंगत्वाचा न्यूनगंड न बाळगता रोजगाराकडे वळावे.भगिरथ प्रतिष्ठानतर्फे जिल्हयातील पंचवीस दिव्यांग बांधवाना कुक्कुटपालनाचे दोन दिवसाचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल,असे प्रतिपादन भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी वेंगुर्ले येथे केले.भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे शुक्रवारी जागतिक अपंग दिनानिमित्त येथील साई मंगल कार्यालयात दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात ३०० ते ३५० दिव्यांग बांधव – भगिनी उपस्थित होते.डॉ.प्रसाद देवधर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास भाजपा प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. जी. जी. टाककर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले,भाजपा दिव्यांग आधाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सहसंयोजक शामसुंदर लोट, साईप्रसाद नाईक, अॅड. सुषमा प्रभू खानोलकर, वजराट ग्रा.पं.सरपंच महेश राणे, उपसरपंच परब, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, दिव्यांग आघाडी वेंगुर्ले तालुका संयोजक भूषण तुळसकर , साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळू प्रभू, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, रविंद्र शिरसाट, वसंत तांडेल व शेखर काणेकर आदी उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी
मनोगत व्यक्त करताना,आज पॅराऑलिंपिक मध्ये अपंग मुले, मुली हि चांगली कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी अपंगत्व किंवा दिव्यांग हा कमीपणा मानू नये, असे सांगितले.भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे म्हणाले की, शासनाच्या सर्व योजना ज्यावेळी जिल्हयातील सर्व दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचतील व ज्यावेळी जिल्हयातील सर्व दिव्यांग आर्थिक दृष्ठया सक्षम होतील त्यावेळीच आपल्याला भाजपा दिव्यांग आघाडीचा जिल्हा संयोजक झाल्याचे समाधान मिळेल.आज जिल्हयात शेतकऱ्यांसाठी कृषिभवन आहे, पत्रकारांसाठी पत्रकार भवन आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी “दिव्यांग भवन” होणे गरजेचे आहे.

यावेळी भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल, साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील या दिव्यांग बांधवासाठी चांगले काम करीत असल्याबद्दल व भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे हे गेली १२ वर्षे दिव्यांग बांधवांसाठी अविरत कार्य करीत असल्याने त्यांचा शरदजी चव्हाण, स्मिता दामले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांच्या हस्ते दिव्यांग आघाडीचे जिल्हा पदाधिकारी जिल्हा सहसंयोजक श्यामसुंदर लोट, सुनिल तांबे, सदानंद पावले, सुनिल चव्हाण, संदेश पवार, स्वाती राऊळ, प्रकाश सावंत, विजय कदम, भूषण तुळसकर , मूरारी पाटकर यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन व आभार भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page