You are currently viewing दाभोली मठाचे मठाधीश प्रद्युम्नानंद स्वामींचे महानिर्वाण..

दाभोली मठाचे मठाधीश प्रद्युम्नानंद स्वामींचे महानिर्वाण..

वेंगुर्ले /-

कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीच्या श्री संस्थान मठ दापोलीचे मठाधीश श्रीमद प्रद्युम्नानंद स्वामी महाराज यांचे २९ नोव्हेंबर रोजी पहाटे महानिर्वाण झाले. सोमवारी त्यांचे पार्थिव दाभोली मठात आणण्यात आले. महाराष्ट्राच्या मुंबईसह अनेक भागांतून तसेच बेळगाव, गोवा, कर्नाटक याठिकानीही प्रद्युम्नानंद स्वामींचे लाखो भक्त आहेत. गेली २७ वर्षे ते ज्ञाती बांधवांचे गुरु म्हणून मार्गदर्शन करीत होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांना गोव्यातील मणिपाल येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. स्वामींचे महानिर्वाण झाल्याचे वृत्त समजताच जिल्हासह राज्य देश-विदेशातील ज्ञाती बांधवांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मंगळवारी पुरोहिताच्या वेद मंत्रघोषात स्वामी महाराजांना समाधीस्थ करण्यात आले.

अभिप्राय द्या..