You are currently viewing आंबोलीच्या डार्क फॉरेस्ट मधील डान्स पार्टीची व्हावी सखोल चौकशी.;मनसेची मागणी.

आंबोलीच्या डार्क फॉरेस्ट मधील डान्स पार्टीची व्हावी सखोल चौकशी.;मनसेची मागणी.

सिंधुदुर्गनगरी /-

आंबोली-चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट हॉटेलमध्ये घडलेल्या “त्या” डान्सपार्टीची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने सिंधुदुर्ग पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबत आज माजी आमदार तथा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन दिले. दरम्यान अन्य राजकीय लोकांनी जरी या कारवाईला विरोध केला, तरी मनसे या कारवाईचे समर्थन करते, असे उपरकर यांनी यावेळी म्हटले आहे.

चौकुळ- आंबोलीतील हॉटेलमध्ये संशयास्पद डान्स पार्टी झाली होती. त्या ठिकाणी अश्लील नृत्य करताना काही परप्रांतीय तरुण-तरुणींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मनसेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. झालेला प्रकार चुकीचा आहे. असे प्रकार यापुढेही सुरू राहिल्यास याठिकाणच्या संस्कृतीवर घाला येऊ शकतो. तरुणपणीच बदनामी होऊ शकते. त्यामुळे याबाबत योग्य ती दखल घेऊन या पार्टीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दयानंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिरवाडकर, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, तालुका संचिव संतोष कुडाळकर, कुडाळ तालुका सच

राजेश टंगसाळी, पिंगुळीशाखा अध्यक्ष वैभव धुरी, अमोल जंगले आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..