सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स खेळाडूंनी राज्यस्तरावर दणदणीत सुरुवात करत राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे. मास्टर्स गेम्स असोसिएशन, महाराष्ट्र व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर, पुणे यांच्या विद्यमाने आयोजित “दुसरी महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धा २०२१” दि. २५ ते २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी इंदापूर, पुणे येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ, जेष्ठ पुरुष व महिला मास्ट खेळाडूंनी ॲथलेटिक्स क्रीडा प्र घवघवीत यश मिळवले.

प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंची नांवे खालील प्रमाणे

४०+वर्षाच्या महिला खेळाडू कणकवली तालुका सुवर्णा अभिजीत जोशी यांनी लांबउडी मध्ये रौप्यपदक व हातोडा फेक मध्ये रौप्यपदक तसेच बॅडमिंटन ऐकेरी व दुहेरी मध्ये सुवर्ण पदक मिळवले. कुडाळ तालुका अनुष्का अजय गावडे यांनी ८० मी. अडथळा शर्यत मध्ये सुवर्ण पदक, ४०० मी. मध्ये रौप्यपदक मिळवले. ४०+ वर्षाच्या पुरुष खेळाडू कुडाळ तालुका दिपक राजाराम कुंभार यांनी २०० मी. मध्ये रौप्यपदक, १५००मी. मध्ये सुवर्ण पदक व लांबउडी मध्ये कांस्यपदक मिळवले. सावंतवाडी तालुका चंद्रकांत बापू शिंदे यांनी ४०० मी. मध्ये कांस्यपदक मिळवले. ५०+ महिला खेळाडू कुडाळ तालुका माधुरी खराडे यांनी ५००० मी. चालणे मध्ये सुवर्ण पदक, तिहेरी उडी मध्ये रौप्यपदक, हातोडा फेक मध्ये सुवर्ण पदक व ४ ×१०० मी. रिले मध्ये सुवर्ण पदक मिळवले. ४०+ पुरुष खेळाडू मालवण तालुका समीर जयवंत राऊत यांनी ५००० मी. चालणे मध्ये रौप्यपदक मिळवले. तसेच या विजयी खेळाडूंची तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून संघटनेचे सचिव बयाजी बुराण यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय मिळवल्या बद्दल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल रावराणे व उपाध्यक्ष अनिल हळदिवे व सर्व कार्यकारी मंडळ यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

===

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page