You are currently viewing हुंबरठ गावातील राणेसमर्थक तथा भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.

हुंबरठ गावातील राणेसमर्थक तथा भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.

कणकवली /-

कणकवली हुंबरठ गावच्या ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे व कार्यकर्त्यांनी आज जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हातात शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, नगरसेवक कन्हैया पारकर, विधानसभा अध्यक्ष सचिन सावंत, बंडू ठाकूर, महेंद्र डीचवलकर, राजू ढवण, तात्या निकम व पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यामध्ये नगरपंचायत निवडणूक व ग्रामपंचायत पोटनिवडणूकचे वारे वाहत असतानाच अशा पद्धतीने भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असल्याने भाजपमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

अभिप्राय द्या..