You are currently viewing वैभववाडीत माजी उपनगराध्यक्षा संपदा राणेंसह ग्रा. पं. सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश..

वैभववाडीत माजी उपनगराध्यक्षा संपदा राणेंसह ग्रा. पं. सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश..

वैभववाडी /-

सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीआधीच सत्ताधारी राणे समर्थक भाजपाला हादरे देण्यास सुरुवात केली असून वैभववाडी माजी उपनगराध्यक्षा संपदा राणे, शिवाजी राणे, सदा माईणकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 गावचे ग्रा. पं. सदस्य गुरु पेडणेकर यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीवर सेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, शिवसेना शहरप्रमुख प्रदीप रावराणे,  माजी नगराध्यक्ष बाबू रावराणे, आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..