You are currently viewing वेंगुर्ले पं. स.तर्फे महाआवास अभियानांतर्गत पुरस्कार वितरण. 

वेंगुर्ले पं. स.तर्फे महाआवास अभियानांतर्गत पुरस्कार वितरण. 

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले पंचायत समितीतर्फे महाआवास अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत व आदर्श घरकुल पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण सभापती अनुश्री  कांबळी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वेंगुर्ले पंचायत समितीच्या नूतन सभागृहात सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास दिन कार्यशाळा  घेण्यात आली. यावेळी उपसभापती सिद्धेश परब, गटविकास अधिकारी उमा पाटील, पं. स.
सदस्य सुनिल मोरजकर, साक्षी कुबल, गौरवी मडवळ,मंगेश कामत,स्मिता दामले, कृषी अधिकारी विद्याधर सुतार, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी महाआवास अभियान सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार (केंद्र पुरस्कृत योजना) आडेली, महाआवास अभियान अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्रथम मठ ग्रामपंचायत द्वितीय वायंगणी ग्रामपंचायत व तृतीय आडेली, महाआवास अभियान अंतर्गत तालुकास्तर आदर्श घरकुल पुरस्कार प्रथम तुळस येथील शंकर जगन्नाथ नाईक, द्वितीय पुरस्कार वायंगणी येथील सुभाष नारायण मेस्त्री, तृतीय तुळस येथील गोविंद दामोदर गोरे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट क्लस्टरसाठी परुळेबाजार, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रथम परुळेबाजार व ग्रामपंचायत स्तर आदर्श घरकुल पुरस्कार परुळेबाजार येथील धोंडी डेमा परुळेकर यांना देण्यात आला.

अभिप्राय द्या..