You are currently viewing दोडामार्ग नगरपंचायत मधील सतराच्या-सतरा उमेदवार भाजपचा झेंडा फडकवत जिंकणार.;जिल्हाध्यक्ष राजन तेली.

दोडामार्ग नगरपंचायत मधील सतराच्या-सतरा उमेदवार भाजपचा झेंडा फडकवत जिंकणार.;जिल्हाध्यक्ष राजन तेली.

दोडामार्ग /-

कसई दोडामार्ग नगरपंचायत ची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असता, दोडामार्ग मधील भाजपचे पदाधिकारी निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसत आहेत,यात दोडामार्ग भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत नगरपंचायत निवडणुकी संदर्भात नियोजन देखील जाहीर केले असता सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र देखील सोडले.येत्या तीन दिवसात इथल्या स्थानिक उमेदवारांनी रीतसर अर्ज करावेत नंतर जिल्ह्यातून याचा निर्णय घेतला जाईल यावर कुणावरही अन्याय केला जाणार नाही आणि ही नगरपंचायत निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात लढवली जाईल तसेच दोडामार्ग नगरपंचायतच्या सतराच्या-सतरा जागा भाजपचा झेंडा फडकवत जिंकणार असे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.
त्याचबरोबर त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र देखील सोडले येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार रोज थापा मारतात जसा पाऊस येण्यापुर्वी बेडूक इकडून तिकडे उड्या मारतो तसे आमदार निवडणुकीच्या अगोदर थापा मारतात पण एकही आश्वासन मात्र पूर्ण करताना दिसत नाहीत म्हणून त्यांचेच पालकमंत्री त्यांना विचारत नाहीत व त्यांना मोडीत काढताना दिसतात असे टीकास्त्र सत्ताधारी पक्षावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सोडले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, चेतन चव्हाण,शैलेश दळवी,एकनाथ नाडकर्णी,संतोष नानचे,समिर रेडकर,सुनील गवस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..