You are currently viewing रमण वायंगणकर यांचा १ डिसेंबर रोजी जाहीर सत्कार.

रमण वायंगणकर यांचा १ डिसेंबर रोजी जाहीर सत्कार.

वेंगुर्ला /-


भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले चे विद्यमान अध्यक्ष रमण शंकरराव वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली व यांच्या रूपाने वेंगुर्ले तालुका भंडारी समाजाला प्रथमच जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळाली. तसेच जिल्हा भंडारी महासंघाच्या सरचिटणीस पदी विकास हरिश्चंद्र वैद्य यांची तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी जयप्रकाश नारायण चमणकर यांची निवड झाली. याबद्दल भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले व समस्त भंडारी समाजाच्या वतीने बुधवार १ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता साईमंगल (डिलक्स) कार्यालय वेंगुर्ले येथे मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी वेंगुर्लेतील सर्व समाज बांधव, भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले चे उपाध्यक्ष अॅड. शाम गोडकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..