You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिलन पाटील व शुभांगी बाबर यांचा राष्ट्रीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्काराने गौरव.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिलन पाटील व शुभांगी बाबर यांचा राष्ट्रीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्काराने गौरव.

सिंधुदुर्ग /-


स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्यामार्फत सिंहगड इंस्टिटयूट लोणावळा येथे दि.८ व ९ नोव्हेंबर या कालावधीत नॅशनल लेव्हल एज्युकेशन कॉन्फरन्स यशस्वीरीत्या पार पडली.
यावेळी संपूर्ण भारतातून उपक्रमशील उपस्थीत होते. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार वितरीत करण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील सौ. मिलन गोपाळ पाटील व सौ. शुभांगी संतोष बाबर या दोन शिक्षिकांचे शिक्षणाधिकारी मा. सौ. सुचिता पाटेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ. मिलन गोपाळ पाटील यांच्या ” प्रश्नोत्तर हजेरी ” या नवोपक्रमाची निवड करण्यात आली तर, सौ. शुभांगी संतोष बाबर यांचा ” The Creative English For Enhancing Communication Skill of Primary Student “. या नवोपक्रमांची निवड करण्यात आली. सदर कॉन्फरन्समध्ये देशभरातील उपक्रमशील शिक्षकांचे नवोपक्रमांचे सादरीकरण झाले. त्यापैकी निवडक शिक्षकांना नॅशनल लेव्हल इनोव्हेशन आवार्डने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात संवेदनशील कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अध्ययन व अध्यापन करतांना कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेवून त्यांनी त्याबद्यल सूचना कराव्यात, त्यावर तोडगा काढावा हे यात अपेक्षित असते.
या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
सौ. मिलन पाटील व सौ. शुभांगी बाबर यांनी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद सर फाउंडेशन या संस्थेने घेऊन त्याना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित केले. याबद्यल यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
सौ. मिलन पाटील व सौ. शुभांगी बाबर या उपक्रमशील शिक्षिकांना सन्मा. केंद्रप्रमुख श्री. सूर्यकांत नाईक सर, केंद्रप्रमुख श्री. डि.एन. पावरा सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. छाया बाळेकुंद्री मॅडम व गटशिक्षणाधिकारी मा. श्री. निसार नदाफ साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.

अभिप्राय द्या..