You are currently viewing कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.;राष्ट्रीय काँग्रेसची कुडाळ पोलीस ठाण्यात मागणी.

कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.;राष्ट्रीय काँग्रेसची कुडाळ पोलीस ठाण्यात मागणी.

कुडाळ /-

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन कुडाळ पोलिस स्टेशनचे पीएसआय शिंदे साहेब यांना देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी शिंदे साहेबांनी वरिष्ठांशी चर्चा करून यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले
कंगना राणावत ने बेताल वक्तव्य करून 1947 ला स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य नसून ते भीक होती,खरे स्वतंत्र 2014 रोजी मिळाले या वक्तव्यावर तिच्यावर 124अ अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन देताना कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी. अभय शिरसाट प्रभारी तालुकाध्यक्ष, मंदार शिरसाट कुडाळ मालवण विधानसभा युवक युवक अध्यक्ष, सुंदर सावंत शहराध्यक्ष , सदासेन सावंत ,उल्हास शिरसाट, चिन्मय बांदेकर युवक शहर अध्यक्ष,तबरेज शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष,तोसिफ शेख अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष, साई मिस्त्री युवक पदाधिकारी.

अभिप्राय द्या..