You are currently viewing बाळासाहेब ठाकरेच्या पवित्र स्मृतीला नेरूर येथील कट्टर शिवसैनिक बाळा पावसकर यांनी आपल्या घरीच वाहिली आदरांजली..

बाळासाहेब ठाकरेच्या पवित्र स्मृतीला नेरूर येथील कट्टर शिवसैनिक बाळा पावसकर यांनी आपल्या घरीच वाहिली आदरांजली..

कुडाळ /-

आज १७ नोव्हेंबर स्वर्गीय हिंदुत्ववाचे शिरोमणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन आहे.या निमित्ताने सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून बाळासाहे यांचे कार्यकर्ते पक्ष कार्यालय असो वा बाळासाहेब यांना मानणाऱ्या संघटना यांचे कार्यालय असो त्या ठिकाणी साहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जाते.असेच एक कुडाळ तालुक्यातील नेरूर – कविलगाव येथील बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले श्री.बाळा पावसकर यांनी नेरूर गावातील आपल्या राहत्या घरी बाळासाहेबांच्या फोटोचे पूजन करून आपल्या घरीच फोटोची पूजा करून बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. मराठी माणसाची अस्मिता आणि हिंदुत्ववाचे शिरोमणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला नेरूर येथील बाळा पावसकर भावपूर्ण पणे आपल्या घरी आदरांजली वाहिली.

अभिप्राय द्या..