You are currently viewing तौक्ती वादळाने कुडाळ तालुक्यातील नुकसान ग्रस्थांना ६ कोटी ५२ लाखाचे वाटप.;बबन बोभाटे यांची माहिती..

तौक्ती वादळाने कुडाळ तालुक्यातील नुकसान ग्रस्थांना ६ कोटी ५२ लाखाचे वाटप.;बबन बोभाटे यांची माहिती..

खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडून निधी आणल्याने बोभाटेनी मानले आभार

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात तौक्ती वादळाने नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी सातकोटी रुपये खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्याला आणले त्या पैकी सहाकोटी बावन्न लाख रुपये आज पर्यत नुकसान ग्रस्थांना मिळाले असल्याची माहिती कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी दीली.

कुडाळ तालुक्यातील तौक्ती वादळाने ब-यापैकी शेत मांगर, घरे व अन्य नूकसानी झाली होती यासाठी पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांनी गावा गावात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दीले त्यानुसार शासनाकडून खुद्द मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांनी सात कोटी रुपयांचा निधी नुकसान ग्रस्थांसाठी देण्यात आला यापैकी सहा कोटी बावन्न लाखाचे वाटप आज पर्यत करण्यात आले उर्वरित तांत्रिक अडचणीमुळे राहिला असुन नुकसान ग्रस्थांना नुकसान भरपाई देण्यासाठी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी चांगले काम केले व सर्कल तलाठी यांचे पण श्री बोभाटे यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..