वेंगुर्ला /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस संपुर्ण देशात विविध सेवाकार्य करुन साजरा केला जात आहे.या उपक्रमाअंतर्गत आडेली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आडेली सोमेश्वर मंदिर परिसर स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमात
जि.प.अध्यक्षा समिधा नाईक, भा.ता.सरचिटणीस तथा आडेली सोसायटी चेअरमन समिर कुडाळकर, शक्ती केंद्र प्रमुख विष्णू कोंडस्कर, यु. मो. तालुका.उपाधक्ष दशरथ गडेकर यांचा प्रमुख उपस्थितीत संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
या वेळी यु.मो.ता. सचिव गितेश शेणई,संतोष पेडणेकर,सामाजिक कार्यकर्ते सच्चीदानंद धर्णे, सुधीर धुरी, कुणाल बिडये,सुधीर मुंडये,रमेश राणे, नारायण आरोलकर,सागर कुडाळकर, हरेश कुडाळकर,सत्यवान कुडाळकर,लाडू धुरी,राजू वराडकर, शिवराम धुरी,रावजी धुरी,जयवंत धर्णे,राजेश शेणई,ऋषी ठाकूर,सुरेश धर्णे,पपू धर्णे , सत्यवान धर्णे, दाजी धर्णे,अंकुश दाभोलकर,हरी धुरी,दादा धर्णे पांडुरंग आडेलकर, विष्णु आडेलकर , प्रसाद ठाकूर, प्रमोद सावळ, पंकज हळणकर,समीर हळणकर,बाळा म्हारव आदी भाजपा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.