You are currently viewing कंगना राणावत हिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.;राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची सावंतवाडीत मागणी.

कंगना राणावत हिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.;राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची सावंतवाडीत मागणी.

सावंतवाडी /-

अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्य बाबत अपमानास्पद वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा तसेच सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांचा अपमान केला. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ. सावली सचिन पाटकर यांनी केली. याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांना निवेदन दिले आहे.

यावेळी कंगना राणावत हिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून तिने केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, सावली पाटकर, इफ्तिकार राजगुरू, सिद्धी कांबळी ,शफिक खान आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..