You are currently viewing बांव व पावशी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ.

बांव व पावशी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ.

कुडाळ /-

पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत बांव मुख्य रस्ता ते वेताळ पाणंद गाळववाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख, पुरहानी योजनेंतर्गत बांव देऊळवाडी ते गाळववाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ पावशी ते नानचे, कर्पे, भोगटेवाडी मध्ये जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १७ लाख रु. ही कामे मंजूर करण्यात आली असून या कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी बाव येथे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, तालुका संघटक बबन बोभाटे, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, विभाग प्रमुख दीपक आंगणे,बाळू पालव, मनोहर टोपले, दीपक राऊत, हरी परब, गुरु परब, प्रशांत परब, नागेश करलकर, बंड्या खोत, श्री. राणे. पावशी येथे सागर भोगटे, प्रसाद शेलटे, बाबा पावसकर, वैशाली पावसकर,भाग्यश्री पावसकर, यशश्री तेली, चित्रा पावसकर, प्रमोद भोगटे, बबलू भोगटे, सर्वेश भोगटे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..