You are currently viewing एकता पुरस्कार प्राप्त चेंदवणकर दशावतार मंडळाचे मालक देवेंद्र नाईक यांचा रूपेश पावसकर यांच्या हस्ते झाला नेरूर येथे सत्कार..

एकता पुरस्कार प्राप्त चेंदवणकर दशावतार मंडळाचे मालक देवेंद्र नाईक यांचा रूपेश पावसकर यांच्या हस्ते झाला नेरूर येथे सत्कार..

कुडाळ /-

तालुक्यातील नेरूर गावांमध्ये नेरुर चव्हाटा मित्रमंडळा तर्फे दशावतारी नाट्यप्रयोगाचा उद्घाटन सोहळा गावचे रहिवासी तसेच शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या हस्ते संपन्न झाला.तसेच काही दिवसांपूर्वी गोवा राज्य कला व सांस्कृतिक संचनालयाचा एकता पुरस्कार मिळाल्याबद्दल चेंदवणकर दशावतार मंडळाचे मालक श्री.देवेंद्र नाईक यांचा सत्कार प्रमुख श्री.रुपेश पावसकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रंगमंचावर दत्ता देसाई, देवेंद्र नाईक,पोलिस पाटील गणपत मेस्त्री,सुधाकर नेरुरकर,प्रकाश साऊळ, गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ पाटकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रवीण नेरुरकर, बाबी साऊळ, सुधीर नेरुरकर, सागर नारींग्रेकर, अजय कदम, उमेश परब हे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा कूर्मदासाची वारी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

अभिप्राय द्या..