वैभववाडी /-
कुर्ली येथील श्री कुर्लादेवी जागृत देवस्थान आहे.नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी अशी तिची ख्याती आहे.कुर्ली वडाचे भरड येथील श्री कुर्लादेवी मंदिरामध्ये त्रिपूरारी पौर्णिमा वार्षिक उत्सव गुरुवारी १८ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.या उत्सवा निमित्त श्री कुर्ला देवी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.सकाळी ८ वाजता ग्रामदेवतांची पूजा,८:३० वा श्री देवीच्या मूर्तीचा अभिषेक ,११ :३० वाजता श्री कुर्ला देवी उत्सव मूर्तीला आभूषण – अलंकार चढविणे ,दुपारी १२ वाजता श्री गणेश पूजन ,दुपारी १२:३० श्री देवीची महापूजा ,दुपारी १ वाजता महाआरती व सामुदायिक गाऱ्हाणे १:३० वाजल्या पासून महाप्रसाद ,दुपारी २ वाजता सामुदायिक लोटांगण, ६ वा देवीला बारा -पाचाचे गाऱ्हाणे ,सायंकाळी ६:३० वाजता देवीला मानकऱ्यांच्या देवीच्या ओटी भरणे ,सायंकाळी ७ वा भाविकांच्या ओटी भरणे ,रात्री रात्री ८:३०वाजल्यापासून नवस बोलणे- नवस फेडणे इ .कार्यक्रम होणार आहेत.रात्री २ वाजता शिवकळा व देवरहाटीचे दिंडीने मिरवणूक काढण्यात येणार आहे .रात्री ३:३० वाजता पालखी प्रदक्षिणा मंदिराच्या सभोवताली पाच फेऱ्या घातल्या जाणार आहेत. यावेळी देवीची आरती करण्यात येणार असून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे .शुक्रवारी सकाळी ६ वा सामूदायिक गाऱ्हाने ,काकड आरती होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती ,मानकरी,बारा -पाच यांनी केले आहे.