You are currently viewing घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

खा. विनायक राऊत, ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर यांनी बांधले शिवबंधन..

कुडाळ /-

घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. शिवसेना कुडाळ तालुक्याचा मेळावा सोमवारी सायंकाळी घावनळे बामणादेवी येथे संपन्न झाला. यावेळी हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. यामध्ये योगेश सावंत,सचिन नार्वेकर, निलेश धुरी,विजू पालव,कृष्णा तेली,चेतन नार्वेकर, गणेश नार्वेकर, दिवाकर वारंग, नारायण सुद्रीक,अमोल तेली,मामु कोकरे,संदीप पालकर,सचिन कोरगावर प्रथमेश सुद्रीक,राज वारंग, किरण वारंग, विशाल वारंग, सचिन जाधव,सुनील नार्वेकर, पपु टिळवे,गणेश धुरी,प्रकाश सावंत,गुरु कोरगावकर,शैलेश नेवगी,महेश ढवण, संजय कोरगावर , बाळा सुद्रीक,गणपत सुद्रीक,सत्यवान वारंग, अजय तेली,दिवाकर झोरे,रामा झोरे, बाबाजी जाधव, संदीप तावडे, संजू तावडे,संतोष तावडे,पंढरी लाड,अर्जुन लाड,विठु कोकरे,धाकू कोकरे,प्रताप कोकरे,भाऊ सुद्रीक,नारायण हेवालेकर, देवेंद्र नेवगी,भाऊ तानावडे,रवी धुरी,बाबुराव वरक,आनंद झोरे, दाजी कोकरे, यांसह बामणादेवी मित्रमंडळ, भुईवाडा मित्रमंडळ,माशाचीवाडी मित्रमंडळ, खुंटवळवाडी मित्रमंडळ, आईनमला पोसवेवाडी, मातखन,पालवटेंब मित्रमंडळ, भीमनगर मित्रमंडळ या मित्रमंडळांचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

अभिप्राय द्या..