You are currently viewing चौके-कुडाळ मार्गावर अपघात कारची डंपरला धडक सुदैवाने प्रवासी बचावले कार कोसळली रस्त्याच्या खाली..

चौके-कुडाळ मार्गावर अपघात कारची डंपरला धडक सुदैवाने प्रवासी बचावले कार कोसळली रस्त्याच्या खाली..

चौके /-

चौके कुडाळ मार्गावर मंगळवारी दुपारी चौके पेट्रोल पंप पासून काही अंतरावर अपघात घडला. कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने चौके येथे पेट्रोल भरण्यासाठी येत असलेल्या चिरे वाहतूक डंपरला धडक दिली. अपघातात कार थेट रस्त्याच्या खाली कोसळली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र कार मधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे बोलले जात होते.चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारवार महावितरण असा लोगो होता. त्यामुळे महावितरणचे अधिकारी अथवा पर्यटनासाठी आलेले कोणी असावेत असे बोलले जात होते. अपघाताची कोणतीही माहिती मालवण पोलीस स्टेशनला देण्यात आली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

अभिप्राय द्या..